2 लाख गुंतवून कमावले 1 कोटी ! ‘या’ IT कंपनीचे शेअर्स ठरले कुबेराचा खजाना

मुंबई – शेअर मार्केटमध्ये खरोखरच एवढी ताकद आहे की ते कोणत्याही गुंतवणूकदाराला जमिनीवरून उचलून राजाप्रमाणे सिंहासनावर बसवू शकतो. पण मार्केटमध्ये असे अनेक अनोळखी शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना फक्त 1 ते 2 वर्षात लखपतीपासून करोडपती बनवले आहे. आज अशाच एका मल्टीबॅगर स्टॉकबद्दल सांगत आहोत ज्याने गेल्या वर्षी मार्केटमध्ये दणकेबाज परतावा देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. हा शेअर सध्या 52 आठवड्यांच्या उच्चांकाच्या खाली चांगला व्यवहार करत असल्यामुळे, तज्ञ सध्या या शेअरवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देत आहेत.

आज आपण ज्या मल्टी बॅगर शेअरबद्दल बोलत आहोत तो डॅन्यूब इंडस्ट्रीज लिमिटेडचा (Danube Industries Limited) हिस्सा आहे. या समभागाने गेल्या 4 ते 5 वर्षांत गुंतवणूकदारांना आश्चर्यकारक रिटन्स दिले आहेत.आजपासून 5 वर्षांपूर्वी म्हणजेच 17 ऑगस्ट 2018 रोजी या स्टोकची किंमत फक्त 90 पैसे होती. गेल्या वर्षी या स्टोकने नवा उच्चांक बनवला आणि तो 72.90 रुपयांवर पोहचला. म्हणजेच, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2018 मध्ये या स्टॉकमध्ये 2 लाख रुपये गुंतवले असतील तर 2022 मध्ये सुमारे 1 कोटी 40 लाख रुपये रिटन्स मिळाले असते.

असा राहिला चढउतार
2018 ची सुरुवात 90 पैशांनी केल्यानंतर, या स्टॉकची किंमत डिसेंबर 2020 पर्यंत त्याच पातळीवर चालू राहिली. 1 जानेवारी 2021 रोजी, हा शेअर 2.58 रुपये झाला आणि दुप्पट परतावा दिला.12 फेब्रुवारी 2021 रोजी या शेअरनेही 5 रुपयांचा टप्पा ओलांडला. दुसरीकडे, 31 डिसेंबरला हा शेअर 16.25 रुपयांवर पोहोचला. म्हणजेच 10 महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट झाले. पण ही फक्त सुरुवात होती. एप्रिल 2022 मध्ये, या स्टॉकने 50 रुपये ओलांडले, तर ऑगस्टमध्ये त्याने 70 रुपये ओलांडले आणि त्याचा सार्वकालिक उच्चांक गाठला.

मात्र 72.90 च्या उच्चांकाला स्पर्श केल्यानंतर हा शेअर सातत्याने घसरत राहिला. डिसेंबर 2022 पर्यंत, तो पुन्हा एकदा 15 रुपयांपर्यंत खाली आला आणि गेल्या सुमारे 8 आठवड्यांपासून या पातळीवर आहे. कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 46 कोटी रुपये आहे. ती आयटी सेवांच्या व्यवसायात गुंतलेली आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 72.90 रुपये होता तर 52 आठवड्यांचा नीचांक 12.05 रुपये इतका होता. 16 ऑगस्टच्या व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर, त्याची वोल्युम 19,489 आहे आणि स्टॉक 15.48 वर 73 पैशांनी वाढला आहे. कंपनीचा PE रेशो 58.40 आहे.

आयटी क्षेत्रातील कंपनी डॅन्यूब इंडस्ट्रीजसाठी २०२२ हे वर्ष खूपच धक्कादायक होते. 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीच्या विक्रीत 30 कोटींची वाढ झाली आहे. चालू वर्ष 2023-24 साठी कंपनीचे विक्री लक्ष्य 350 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला दुबई आणि कतारमधून सुमारे 125 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. डॅन्यूब इंडस्ट्रीजने अलीकडेच 1:1 बोनस जाहीर करून गुंतवणूकदारांना भेट दिली.