सातारा – मधुकर शेंबडे यांच्याकडून सुरक्षित वाहतुकीसाठी पत्रके

सातारा – 35 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त येथील वाहतूक अभ्यासक मधुकर शेंबडे यांनी रस्ता सुरक्षिततेबाबत संकलन व लेखन करून तयार केलेली वाहतूक शिक्षण, रहदारी नियम आदी माहिती देणारे पत्रक विविद शाळांमध्ये वितरित केली.

शाहूनगरमधील विशाल सह्याद्री माध्यमिक विद्यालय व पेरेन्टस स्कूल तसेच राजपथावरील कन्या शाळा आदी ठिकाणी शासन, वाहनचालक, विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या हितार्थ श्री. शेंबडे यांनी वितरीत केली. जनतेचे सहकार्य व सहभाग घेऊन मधुकर शेंबडे गेली 30 वर्षे सातत्याने मनापासून झोकून देऊन समाजसेवा व रस्ता सुरक्षा क्षेत्रात प्रशिक्षक म्हणूनही महाराष्ट्रभर काम करीत आहेत.

रस्ता सुरक्षा व वाहनचालकांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी जिल्ह्यातील विविध शासकीय विभाग, सेवाभावी संसथा, उदयोजक अशा अनेक जणांचे सहकार्य, मार्गदर्शन व सहभाग मिळवून हे काम करीत आहेत.