नगर | शिर्डी ते जेजुरी पालखीचे शिर्डीतून प्रस्थान

शिर्डी, (प्रतिनिधी) – पदयात्रेने देव दर्शनासाठी जाणे हे भाविकांसाठी खरोखर भाग्यवान असून ते नशीबवान आहेत, अशी भावना माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी व्यक्त केली.

शिर्डी ते जेजुरी जाणाऱ्या पालखीला कैलासबापू कोते व मनसे नगरसेवक दत्तात्रय कोते यांनी श्रीफळ वाढवून भाविकांना शुभेच्छा दिल्या. शहरातील गणेशवाडी येथून दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त शिर्डी ते जेजुरी पायी पदयात्रा दरवर्षी जात असते. गुरुवारी ही पदयात्रा शिर्डी येथून जेजुरी गडाकडे रवाना झाली.

कैलासबापू कोते व दत्तात्रय कोते यांच्याहस्ते शिर्डी शहरातील खंडोबा मंदिर समोर या पालखीत जाणाऱ्या भाविकांना प्रवासासाठी शुभेच्छा देऊन पालखीचे जेजुरी गडाकडे प्रस्थान झाले. याप्रसंगी खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष अजय नागरे यांनी भाविकांचे स्वागत केले.

यावेळी पालखी चालक पोपटराव उमाप, शिवा उमाप, प्रशांत ठोंबरे , ज्ञानेश्वर पवळे, अविनाश जाधव, राजेश कांबळे, संपत हातांगळे, आकाश पवळे, विजय उमाप, मिलिंद घोगरे ,सुनील गुलदगड, दामोदर उमाप आदी नागरिक उपस्थित होते.