धक्कादायक..! भुसावळमध्ये कारवर अज्ञातांकडून अंधाधूंद गोळीबार; माजी नगरसेवकासह एकाचा मृत्यू

जळगाव । भुसावळमध्ये अंधाधूंद गोळीबारकरून दोन जणांचा खून करण्यात आला. या गोळीबारात  माजी नगरसेवक संतोष बारसेसह सुनील राखुंडे यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण भुसावळ शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे हे दोघेही कारमधून जात होते त्या दरम्यान, मारेकररी त्यांच्या चर्चा पाठलाग करू लागले. त्यांनी या दोघांवरही बंदुकीतून गोळीबार केला. मारेकऱ्यांनी त्यांच्यावर १० ते १५ राऊंड फायर केल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्दैवी घटनेत संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलीस आणि शीघ्र कृती दलाच्या जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.दरम्यान, दोघांचे मृतदेह रात्रीच पोलीस बंदोबस्तात जिल्हा रुग्णालयात दाखल झाले.

दरम्यान, मयत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी  संताप व्यक्त करत प्रचंड आक्रोश केला.त्यांच्यावर हल्ला नेमका कोणी केला, त्यात कोण-कोण सामील होतं याचा पोलीस कसून शोधत घेत असून मारेकऱ्यांच्या शोधार्थ पोलिसांचे पथक ठिकठिकाणी रवाना झाले आहे.

हे वाचले का ? ग्राहकांनो… सोन्याच्या दरात किचिंत घसरण’ जाणून घ्या आजचा ‘बाजार भाव’