धक्कादायक ! आई-पत्नीसह 8 जणांची सामूहिक हत्या; नंतर स्वतःच घेतला गळफास

छिंदवाडा – मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे एका युवकाने आपल्या कुटुंबातील 8 जणांची हत्या करून गळफास लावून घेतला. आरोपीने आधी पत्नीवर कुऱ्हाडीने वार केला, त्यानंतर आई-बहीण, भाऊ-वहिनी आणि दोन भाची-पुतणे यांची हत्या केली. मामाच्या घरी गेल्यावर त्याने 10 वर्षाच्या चिमुरडीवरही हल्ला केला, मात्र तो जीव वाचवण्यासाठी पळून गेला. यानंतर लोकांनी पोलिसांना माहिती दिली.

तामिया तहसीलमधील माहुलझीर पोलिस ठाण्याच्या बोदल कचर गावात ही घटना घडली. मंगळवार-बुधवारी रात्री 2.30 वाजता आरोपीने पत्नी (23), आई (55), भाऊ (35), वहिनी (30), बहीण (16), पुतण्या (5), दोन भाची (2) यांची हत्या केली. या घटनेनंतर गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

एसपी मनीष खत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे लग्न २१ मे रोजीच झाले होते. आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी त्याच्यावर होशंगाबाद येथे उपचारही झाले होते.

पहाटे ३ वाजता पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. आजूबाजूच्या पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले. घरात मृतदेह पडले होते, आरोपीचा मृतदेह काही अंतरावर झाडाला लटकलेला होता.

बोदल कचर हे आदिवासीबहुल गाव आहे. आरोपी दिनेशचे घर गावाच्या एका बाजूला आहे. घरातील सर्व सदस्यांची हत्या केल्यानंतर तो काकाच्या घरी पोहोचला. काकाचे घर त्याेच्या घरापासून ५० मीटर अंतरावर आहे.

येथे त्याने 10 वर्षाच्या मुलावर हल्ला केला, कुऱ्हाडीने मुलाच्या जबड्यावर वार केले. दरम्यान, आजीने येऊन आरडाओरड केला आणि आरोपी पळून गेला. आजूबाजूचे लोकही जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

एसपीच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी जंगलात शोध घेतला. आरोपीचा मृतदेह गावापासून 150 मीटर अंतरावर असलेल्या नाल्याच्या काठावर झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.