धक्कादायक! करोना लसीचा डोस घेतलेले आरोग्यमंत्रीच झाले पॉझिटिव्ह

नवी दिल्ली – करोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत सहभागी झालेले हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज (Haryana Home Minister Anil Vij) यांना करोनाची लागण (Coronavirus) झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी स्वतः ट्विटवर अकाउंटवरून दिली आहे.

‘मी करोना संक्रमित असल्याचे आढळून आले आहे. अंबालाच्या सिव्हील रुग्णालयात माझ्यावर उपचार सुरू असून माझ्या संपर्कात आलेल्यांनी तातडीने कोविडची चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन अनिल विज यांनी ट्विटरवरून केले आहे.

कोवॅक्सिन (Covaxin) लसीच्या पहिल्या दोन टप्प्यातील चाचण्या अत्यंत यशस्वीपणे पार पडल्याचा दावा कंपनीने केला होता. यानंतर २० नोव्हेंबर रोजी कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या रोहतक, हैद्राबाद आणि गोवा येथे झाल्या असून यामध्ये अनिल विज यांनी स्वयंसेवक म्हणून सहभागी झाले होते. अंबाला येथील रुग्णालयात अनिल विज यांना कोवॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला होता. परंतु, १५ दिवसातच अनिल विज यांचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह (Anil Vij Tests COVID 19 Positive) आला आहे.

तिसऱ्या टप्प्यात २०० स्वयंसेवकांना पहिला डोस दिला होता. तर २८ दिवसानंतर दुसरा डोस दिला जाणार आहे. यानंतर ४८ दिवसांनी किती प्रमाणात अँटीबॉडिज तयार झाल्या याची चाचणी केली जाणार आहे. याच्या परिणामानंतर देशभरात निश्चित केलेल्या २१ विभागात २५ हजार ८०० स्वयंसेवकांना लस दिली जाणार आहे.

Leave a Comment