तारा सुतारिया-अर्जुन कपूरने सुरू केलेले “एक व्हिलन रिटर्न्स’ चे शूटिंग

तारा सुतारिया आणि अर्जुन कपूर यांनी एक विलन रिटर्न्सचे शूटिंग सुरू केल्याची घोषणा आज केली. ताराने इंस्टाग्रामवर सिनेमाचा क्‍लॅप बोर्डचा फोटो शेअर केला आहे. अर्जुनने देखील आपल्या फॅन्सना ही बातमी दिली आहे. हे दोघेही 14 एप्रिलला शूटिंगसाठी गोव्याला रवाना झाले.

“एक व्हिलन रिटर्न्स’ च्या दुसऱ्या शेड्युलचे शूटिंग आज सुरू झाले आहे. पहिले शेड्युल एक मार्चपासून मुंबईतच सुरू झाले होते. तेव्हा जॉन अब्राहम आणि दिशा पटणीचे शूटिंग झाले आहे. मात्र आता करोनाच्या साथीमुळे दुसरे शेड्युल गोव्यामध्ये करायचे ठरले आहे.

“एक व्हिलन’चे शूटिंगदेखील गोव्यातच झाले होते. दिग्दर्शक मोहित सुरीच्या “मलंग’,”आशिकी 2′ आणि इतर सिनेमांचे शुटिंगही गोव्यातच झाले होते.

Leave a Comment