पुणे-दौंड मार्गावरील शटल सेवा रद्द

 

पुणे – लोणी स्थानकावर तांत्रिक कारणांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील काही गाड्या रद्द केल्या असून, शुक्रवारी (26 मार्च) पुणे-दौंड मार्गावरील शटल सेवा रद्द केली आहे. तर, लांबपल्ल्याच्या गाड्या वळवल्या आहेत.

पुणे रेल्वे विभागातील लोणी स्थानकावर तांत्रिक कारणांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल आहे. गुरुवारी या मार्गावर लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या.

शुक्रवारी (26 मार्च) पुणे-दौंड-पुणेदरम्यान धावणारी शटल सेवा, पनवेल-नांदेड विशेष गाडी, नागपूर-पुणे विशेष गाडी, पुणे-अजनी विशेष गाड्या रद्द केली आहे. तर, इंदौरहून 26 मार्च रोजी दौंड येथे येणारी इंदौर-दौंड एक्‍स्प्रेस पुण्यापर्यंत धावणार आहे. तर, 26 रोजी दौंड-इंदौर विशेष गाडी पुण्याहून सुटणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

Leave a Comment