Monkeypox Vaccine: मंकीपॉक्स लसीची सर्व तयारी पूर्ण – आदर पूनावाला

नवी दिल्ली – सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी मंगळवारी मंकीपॉक्स लसीसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेतली. ते म्हणाले की, आम्ही मंकीपॉक्सच्या लसीवर संशोधन करत आहोत.

पूनावाला म्हणाले की, मंकीपॉक्स जगामध्ये बऱ्याच काळापासून अस्तित्वात आहे आणि ते करोना व्हायरससारख्या साथीचे स्वरूप घेणार नाही. करोना विषाणूच्या संसर्गाविरुद्धच्या लढ्यात तयार केलेल्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधांमुळे आम्ही मंकीपॉक्ससारखे आजार शोधण्यात सक्षम आहोत.

दरम्यान, जगातील काही देशांमध्ये हवामान आणि इतर परिस्थितींमुळे मंकीपॉक्सचे रुग्ण वाढले आहेत. भारतात देखील संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत, परंतु आम्ही लस तयार करत आहोत काही महिन्यांतच लस उपलब्ध होईल, जिथे मंकीपॉक्स विषाणू संसर्गाचे हॉटस्पॉट असेल तिथे आपण लस देऊ शकतो, असेही पुनावाला यांनी सांगितले.