चांदीच्या दराने केले आश्चर्यचकित, एकाच दिवसात 2600 रुपयांनी वाढ

Gold Silver Rates: सोन्या-चांदीचे भाव रोज नवनवे विक्रम करत आहेत. जागतिक बाजारातील मजबूतीमुळे देशाची राजधानी दिल्लीत चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा भाव 2600 रुपयांनी वाढून 95900 रुपये प्रतिकिलो झाला, तर सोन्याचा भाव 150 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला.

गेल्या ट्रेडिंग सत्रात चांदीचा दर 93,300 रुपये प्रति किलो होता. तर सोन्याचा भाव 73,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता. आज सोन्याचा भाव 73,650 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. सोने चांदीचे दर आणखी वाढतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.