करोनामुळं अडचणीत आलेल्या लोकांना गायिका मिता शहा यांचा मदतीचा हात

पुणे –  भजन गायिका आणि क्रिप्स फांऊडेशनच्या महिला विंगच्या प्रमुख मिता शहा यांनी गोरगरिबांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. शहा यांनी डॉन बॉस्को येथे गरिब, स्थलांतरित लोकांना रेशन किट वाटप केले. एक वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या लोकांना मिता शहांनी मदत केली आहे.

मिता शहा म्हणाल्या की, आपण आमच्याकडून जे धान्य स्वीकारले त्याबद्दल धन्यवाद. लॉकडाऊनमध्ये लोकांचे हाल होऊ नये यासाठी आम्ही धान्य वाटप करत आहोत. यावेळी त्यांनी उपस्थितांसाठी भजनही गायले.

हा कार्यक्रम डॉन बॉस्को युथ सेंटर कोरेगाव पार्क पुणे येथे पार पडला. यावेळी संस्थेचे रेक्टार फादर ईयन डॉल्टन यांनी मिता शहा यांचे आभार मानले. फादर डॉल्टन म्हणाले की, डॉन बॉस्को ही संस्था स्थलांतरित लोकांसाठी काम करत आहे. कोविडच्या काळात मिता शहा यांनी स्थलांतरित लोकांना धान्य वाटप केले. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो.

यावेळी डॉन बॉस्को युथ सेंटर कोरेगाव पार्क पुणे येथील रेक्टार फादर ईयन डॉल्टन, डॉन बॉस्को युथ सेंटर कोरेगाव पार्क पुणेचे संचालक फादर ऑज्बन फुर्टाडो उपस्थित होते.