compassionate job: अनुकंपा तत्त्वावर भावाच्या जागी बहिणीला नोकरी मिळू शकत नाही – न्यायालय

बेंगळुरू  – विवाहित बहिणीचा तिच्या भावाच्या ‘कुटुंबा’च्या व्याख्येत समावेश नाही, असे सांगून भावाच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्त्वावर (compassionate job) त्याच्या बहिणीला नोकरी मिळू शकत नाही. अशा प्रकारे नोकरीची मागणी करणाऱ्या एका महिलेची याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आणि न्या. कृष्णा दीक्षित यांच्या खंडपीठासमोर तुमकुरू येथील रहिवासी असलेल्या 29 वर्षीय पल्लवी जीएमने दाखल केलेल्या अपिलावर सुनावणी सुरू होती.

न्यायालयाने म्हटले, न्यायालय व्याख्या प्रक्रियेद्वारे कुटुंबाच्या वैधानिक व्याख्येची व्याप्ती वाढवू शकत नाही. जेव्हा राज्यघटनेच्या निर्मात्यांनी कर्मचाऱ्याचे कुटुंब सदस्य म्हणून अनेक शब्दांमध्ये विशिष्ट व्यक्ती निर्दिष्ट केल्या आहेत. त्यामुळे आम्ही कुटुंबाच्या कायदेशीर व्याख्येतून कोणाल अवाढवू अथवा कमी करु शकत नाही. त्यामुळे मृत व्यक्तिच्या जागी त्याच्या बहिणीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देणे, कायद्याच्या चौकटीत बसणारे नाही.

बेंगळुरू वीज पारेषण (बेस्कॉम) कंपनीमध्ये काम करत असलेल्या एका पुरुष कर्मचाऱ्याचा कामावर असताना अपघाती मृत्यु झाला. त्याच्या बहिणीने न्यायालयात सांगितले होते की, उदरनिर्वाहासाठी ती तिच्या मृत भावावर अवलंबून होती आणि त्याच्या कुटुंबाचा भाग होती. त्यामुळे त्याच्या जागी अनुकंपा तत्त्वार आपल्याला नोकरी मिळावी, यासाठी तिने न्यायालयात याचिक दाखल केली होती. बेस्कॉमने मात्र महिलेच्या दाव्याला विरोध केला होता.