स्मिता पाटील यांचा लेकाने नावात केला बदल,’प्रतीक पाटील बब्बर’

मुंबई – अभिनेता प्रतीक बब्बरचे वैयक्तिक आयुष्य अनेकदा मीडियाच्या चर्चेत असते. मग ते अभिनेत्याचे प्रेम जीवन असो किंवा वडिलांसोबतचे त्याचे नाते असो.

याशिवाय आणखी  प्रतिक अनेकदा आई आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील बोलतो. प्रतीक आणि  स्मिता पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. दरम्यान, प्रतीक बब्बरने आपले नाव बदलण्याची घोषणा केली आहे. जे त्यांच्या दिवंगत आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या स्मरणार्थ असेल.

प्रतीक बब्बरने आता आपल्या आईला आदर म्हणून आपले नाव बदलून प्रतीक पाटील बब्बर असे ठेवले आहे. यासोबतच,  प्रतिकने असेही सांगितले की, ‘आता चित्रपटाच्या श्रेयसमध्ये त्याचे नाव तसेच राहावे अशी त्याची इच्छा आहे.’

प्रतीक हा स्मिता पाटील आणि अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा असून 15 वर्षांहून अधिक काळ अभिनय करत आहे. प्रतीकने सोशल मीडिया अकाउंटवर त्याचे नावही बदलले आहे.

“माझे वडील आणि माझे संपूर्ण कुटुंब, माझे दिवंगत आजी आजोबा आणि माझ्या दिवंगत आईच्या आशीर्वादाने, मी माझ्या आईचे आडनाव माझे मधले नाव म्हणून जोडण्याचा निर्णय घेतला आहे, जे माझे नवीन स्क्रीन नाव देखील असेल,” असे अभिनेत्याने एका निवेदनात म्हटले आहे.