अकोला कारागृहात आतापर्यंत ६८ कैदी कोरोना बाधित

अकोला: अकोला जिल्हा कारागृहातील ६८ कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्यातील बरीच संवेदनशील आहेत. तुरुंगातच आयसोलेशन वॉर्ड बनविण्यात आला आहे. कैद्यांची काळजी घेण्यासाठी सर्व व्यवस्था केली असल्याचे, उपजिल्हाधिकारी संजय खडसे, यांनी सांगितले. 

दोन दिवसांपुर्वी १८ कैदी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर रविवारी आलेल्या अहवालात सुमारे ५० कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कारागृहातील ४०० कैदीही धोक्यात सापडले आहेत.

दरम्यान, खबरदारी म्हणूण कैद्यांसाठी स्वतंत्र कोवीड सेंटर कार्यान्वीत करण्यात आले आहे. या ठिकाणावरुन कैदी पळून जाणार नाहीत, तसेच त्यांना उपचारही मिळावे, या दृष्टीने त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येणार आहे.

Leave a Comment