पुणे जिल्हा | सामाजिक न्याय पुरस्काराने अ‍ॅड. मुळूक सन्मानित

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – सरन्यायाधीश स्व. यशवंतराव चंद्रचुड सामाजिक न्याय पुरस्काराने वकिली व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे अ‍ॅड. अरुण मुळूक यांचा गौरव करण्यात आला.

महाराष्ट्र साहित्य परिषद खेड शाखा यांच्या वतीने राजगुरूनगर येथे ज्येष्ठ साहित्यिक नामदेव ढसाळ यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील यांच्या उपस्थितीत अ‍ॅड. अरुण मुळूक महाराष्ट्र साहित्य परिषद खेड तालुक्याच्या वतीने सरन्यायाधीश स्व. यशवंतराव चंद्रचुड सामाजिक न्याय पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक डॉ. विजय चोरमारे, डॉ. अभिजित सोनवणे (डॉक्टर फॉर बेगर्स), साहित्य अकादमी प्राप्त लेखक ऐश्वर्य पाटेकर, महाराष्ट्र साहित्य परिषदचे खेड तालुका अध्यक्ष संतोष गाढवे, अ‍ॅड. सतीश गोरडे, धर्मराज पवळे, सदाशिव अमराळे, मधुकर गिलबिले, अ‍ॅड. नवनाथ गावडे, आखरवाडीच्या सरपंच दिपाली मुळूक, माजी सरपंच मोनिका मुळूक, ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. माणिकराव पाटोळे, राजगुरूनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष संजय गोपाळे, उपाध्यक्ष अ‍ॅड. बिभीषण पडवळ, ग्रामपंचायत सदस्य नीलम मुळूक यांच्यास राज्यभरातून आलेले साहित्यिक कवी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी संतोष गाढवे यांनी, सूत्रसंचालन प्रा. कविता शिर्के, धर्मराज पवळे यांनी तर अ‍ॅड. सतीश गोरडे यांनीॅाअभार मानले.