थलैवासाठी काहीपण.! ‘जेलर’ पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर, कुठे ते वाचा….

मुंबई – साऊथचा सुपरस्टार ‘थलैवा’ रजनीकांत सध्या त्याच्या मोस्ट अवेटेड ‘जेलर’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. निर्मात्यांनी ट्रेलर रिलीज करताच त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पुन्हा एकदा 72 वर्षीय रजनीकांत अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत.

चित्रपटाचा ट्रेलर धमाकेदार आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी आणखी उत्सुक व्हाल. ट्रेलरमध्ये रजनीकांतच्या अ‍ॅक्शनसोबतच त्याचे डायलॉग दमदार आहेत. रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा चित्रपट 250 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे.

या चित्रपटात रजनीकांतसोबत तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट येत्या 10 ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार असून, प्रदर्शनापूर्वीच सिनेमाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.

अभिनेते रजनीकांत जवळपास 2 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. त्यामुळे चेन्नई आणि बंगलोरमधील अनेक कंपन्यांनी 10 ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी जाहीर केली आहे.

याआधी प्रोमो आणि ट्रेलरमुळे या चित्रपटाने आधीच चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. आणि अश्यातच आता या चेन्नई आणि बंगलोर मध्ये चित्रपट पाहण्यासाठी चक्क कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे.