‘सन ऑफ सरदार 2’मध्ये अजय देवगणसोबत झळकणार सोनाक्षी सिन्हा? नवी अपडेट समोर

Son of Sardar 2| अजय देवगण सध्या अनेक चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात सिंघम अगेन, रेड 2, दृश्यम 3,गोलमाल 5  यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. यातच आता अभिनेता अजय देवगण आणखी एका चित्रपटात झळकणार आहे. अजय देवगणचा सन ऑफ सरदार हा चित्रपट प्रचंड गाजला होता. यानंतर आता या चिटपटाचा सिक्वेलची तयारी केली जाणार आहे.

सिक्वेल चित्रपटांमध्ये अनेकदा चित्रपटातील कलाकारांना घेऊन फ्रँचायझी पुढे नेण्याला निर्मात्यांचे प्राधान्य असते. पण, ‘सन ऑफ सरदार 2’ सिनेमा पूर्णपणे नवीन टीमसोबत ‘सन ऑफ सरदार 2’ बनवण्यात येणार आहे. यामध्ये दिग्दर्शकापासून कलाकारांपर्यंत संपूर्ण टीम नवीन असणार आहे. ‘सन ऑफ सरदार 2’ मध्ये मूळ चित्रपटातून फक्त अजय दिसणार आहे. सोनाक्षी आणि संजय दोघेही सिक्वेलमध्ये दिसणार नाहीत. Son of Sardar 2|

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, अजय देवगण या वर्षी जूनपासून लंडनमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पंजाबी चित्रपट उद्योगातील प्रसिद्ध दिग्दर्शक विजय कुमार अरोरा करणार असल्याचं बोललं जात आहे. पंजाबी दिग्दर्शक विजय कुमार अरोरा ‘सन ऑफ सरदार 2’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र, याआधी त्यांनी जवळपास ३० हिंदी चित्रपटांमध्ये सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. Son of Sardar 2|

सन ऑफ सरदार 2 हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट असेल. सध्या अजय सिंघम अगेन आणि रेड २ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हे दोन्ही चित्रपट मे महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: 

‘दादा वहिनी हे तुमचं कुटुंब, आम्हीच इथले उमेदवार’ ; अजित पवारांच्या गावातील घरावरील पाट्यांची सर्वत्र चर्चा