Sonam Kapoor: अनिल कपूर यांच्या फिटनेसचे सोनमने सांगितले रहस्य; ‘या’ व्यक्तीला दिले श्रेय

Sonam Kapoor: बॉलीवूड अभिनेते अनिल कपूर अभिनयासह त्यांच्या फिटनेससाठी अधिक करून ओळखले जातात. आजही ते अनेक चित्रपटांमध्ये उत्साहाने काम करताना दिसतात. अनिल कपूर ‘ॲनिमल’ आणि ‘फाइटर’ सारख्या चित्रपटांमुळे चर्चेत आले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी साधारण 45 वर्ष पूर्ण केली आहेत. मात्र तरीही ते नव्या अभिनेत्यांना तगडी टक्कर देताना दिसतात. नुकतेच एका कार्यक्रमात सोनम कपूरने वडील अनिल कपूर यांच्या फिटनेसचे रहस्य सांगितले आहे.

एका पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान सोनम कपूरने बोनी, संजय आणि अनिल या तीनही भावांच्या जीवनशैलीबद्दल खुलासा केला आहे. सोनम म्हणाली, “माझे वडील हे फारच शिस्तप्रिय आहेत. धूम्रपान, मद्यपान असे कोणतेही व्यसन त्यांना नाही. बोनी कपूर यांचे मात्र विरुद्ध आहे. त्यांना आयुष्य मजेत जगायला आवडते. त्यांना खायला आणि कधीतरी मद्यपान करायला आवडते .संजय काका सुद्धा तसेच आहे. पण हे सगळे तब्येत जपणारे असल्याने  ते या वयातही सुंदर पुरुष आहेत.”

सोनमने अनिल कपूर यांच्या निरोगी आयुष्याचे श्रेय आई सुनीला यांना दिले आहे. तिने सांगितले की, “माझी आई सुरुवातीपासून आणि आता वडिलांचे वय 60 पेक्षा जास्त असतानाही आरोग्याची काळजी घेते. मला आठवते की माझ्या आईने पहिल्यांदा मुंबईत
पर्सनल ट्रेनिंगसाठी जीमची सुरुवात केली.  हे बऱ्याच वर्षांपूर्वी घडले होते, त्यामुळे माझी आई सुरुवातीपासूनच वडिलांना निरोगी आरोग्यासाठी प्रोत्साहन देते.”

सोनमच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर, 2018 मध्ये ती ‘जोया फॅक्टर’ या चित्रपटात दिसली होती. मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. सोनमने 2022 मध्ये एका मुलाला जन्म दिला आणि तेव्हापासून ती मातृत्वाची जबाबदारी पार पाडत आहे. यानंतर ती फारशी कोणत्याही चित्रपटात दिसली नाही.