लवकरच ‘दबंग 4’ चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात – सलमान खान

मुंबई – बॉलीवूडचा चुलबुल पांडे अर्थात सलमान खानचा आगामी ‘दबंग 3’ हा बहुप्रतिशक्षित चित्रपट लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून महेश मांजरेकर यांची मुलगी ‘सई मांजरेकर’ बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

याशिवाय सलमान सोबत सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान आणि माही गिल हे देखील मुख्य भुमिकेत दिसून येणार आहेत. यामध्ये खलनायक म्हणून साउथचे स्टार किच्चा सुदीप दिसून येणार आहेत. हा चित्रपट 20 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

दरम्यान, दबंग 3 च्या प्रदर्शानाधी सलमानने ‘दबंग 4’ बद्दल अनेक खुलासे केले आहेत. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत तो बोलत होता. दबंग 4 या चित्रपटाची कथा, पटकथा लिहून तयार आहे व लवकरच या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात होणार आहे.

आजच्या काळात, चित्रपट निर्माते जेव्हा सीक्वल बनवण्यासाठी धडपडत असतात, तेव्हा दबंग सिरीजमधील प्रीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच सिरीजमधील चौथा चित्रपटही लिहून तयार असल्याचे सलमानने सांगितले.

 

Leave a Comment