ऑस्ट्रेलिया विजयाच्या उंबरठ्यावर; दक्षिण आफ्रिक्रा दुसऱ्या डावात 371 धावांनी पिछाडीवर

मेलबर्न – डेव्हीड वॉर्नरच्या द्विशतकी खेळीच्या नंतर ऍलेक्‍स केरीनेही फटकावलेल्या शतकाच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 8 बाद 575 धावांवर घोषित केला. त्यांनी दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 189 धावांवरच रोखले होते. त्यानंतर पाचशेपेक्षा जास्त धावंचा डोंगर उभारून दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा 1 बाद 15 अशी स्थिती झाली असून ऑस्ट्रेलिया या कसोटीत विजयाच्या उंबरठ्यावर आहे.

#TeamIndia | ‘या’ खेळाडूचं करिअर संपुष्टात? कसोटी, टी-20 आणि आता वनडेमधूनही हकालपट्टी

दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 189 धावांवर गुंडाळल्यावर ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारली. सलामीवीर डेव्हीड वॉर्नरने द्विशतकी खेळी केली होती. त्यानंतर त्याला क्रॅम्पचा त्रास होऊ लागल्यावर मैदान सोडावे लागले होते. बुधवारी 3 बाद 386 धावांवरून पुढे खेळ सुरू झाल्यावर तो फलंदाजीला आला व लगेचच बाद झाला. त्यानंतर ट्रॅव्हिस हेडने अर्धशतक पूर्ण केले. तो बाद झाल्यावर ऍलेक्‍स कॅरीने दमदार शतक फटकावले व कॅमेरुन ग्रीनच्या साथीत संघाला साडेपाचशे धावांच्याही पुढे मजल मारून दिली.

#INDvsSL2023 | संघ निवड केली पण कोणी…बरखास्त निवड समितीबाबत बीसीसीआयची लपवाछपवी

ग्रीननेही नाबाद अर्धशतकी खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून अनरीच नोर्जेने 3 तर, कागिसो रबाडाने 2 गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेने 386 धावांच्या पिछाडीवरून बुधवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा त्यांनी दुसऱ्या डावात 1 गडी गमावून 15 धावा केल्या असून त्यांना डावाचा पराभव टाळण्यासाठी अद्याप 371 धावांची गरज आहे. या कसोटी सामन्याचे अद्याप दोन दिवस बाकी असून ऑस्ट्रेलिया विजयाच्या उंबरठ्यावर आहे.