पुणे जिल्हा | 4800 हेक्टरवर होणार सोयाबीनची पेरणी

बेल्हे, (वार्ताहर) – बेल्हे मंडल कार्यालयाअंतर्गत एकूण 35 गावे असून यामध्ये अंदाजे 4800 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार आहे. त्यासाठी 2640 क्विंटल बियाणे बियाणांची गरज आहे. सध्या शेतक-यांकडे 3200 क्विंटल बियाणे उपलब्ध आहे, अशी माहिती मंडल कृषी अधिकारी राजश्री नरवडे यांनी केले आहे.

खरीप हंगाम पूर्व नियोजन मोहीम वडगाव आनंद (ता.जुन्नर) येथील शिवाजी डोके यांच्या शेतावर आयोजीत करण्यात आली होती, त्याप्रसंगी उपस्थित शेतक-यांणा मार्गदर्शन करताना नरवडे बोलत होत्या. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी वैभव विश्वे, कृषी पर्यवेक्षक शिवकांत कोल्हे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

राजश्री नरवडे म्हणाल्या की, उत्पादित झालेल्या सोयाबीन बियाणे पेरणीसाठी उगवण क्षमता चाचणीसाठी सुरुवातीला एक ओले बारदान घ्यावे त्यावर सोयाबीनचे 100 दाणे 10 ओळीत एक सारखे ठेवावे आणि त्या बारदानाची गुंडाळी करून सावलीत ठेवावे.

बारदानातील पाणी वाळल्यानंतर तर थोडे अर्धा ग्लास पाणी त्यावर ओतावे व नंतर तीन दिवसांनी गुंडाळी खोलून त्यातील किती बियाणे उगवले आहे ते तपासावे आणि त्यानुसार पेरणीसाठी किती बियाणे आवश्यक आहे ते समजते. समजा उगणक्षमता क्षमता 85 बियाणे उगवून आले तर 85 टक्के बियाणांची उगवण क्षमता आहे.

एकरी 22 किलो बियाणे लागते
एकरी बीबीएफ यंत्राने पेरणी केली तर 22 किलो बियाणे लागते त्यानुसार पेरणी करावी. तसेच पेरणी पूर्वी बीजप्रक्रिया करताना एफआयर पद्धतीने करावी म्हणजे अगोदर बुरशी नाशक, नंतर कीटक नाशक आणि त्यानंतर जैविक अशी तीन टप्यात बीजप्रक्रिया केली तर बियाणे रोगमुक्त राहते व पीक जोमदार येते.

खरीप पूर्व नियोजन मध्ये सोयबिनचे वाढते क्षेत्र बघता बियाणांचा तुटवडा होऊ नये म्हणून घरगुती बियाणे वापरावे व त्यासाठी बियाणे उगवण क्षमता चाचणी घ्यावी बियाणे पेरतात त्यास रासायनिक व जैविक बीज प्रक्रिया करावी शेतामध्ये बियाणे पेरताना बीबीएफ यंत्राचा वापर करावा. – राजश्री नरवडे, कृषी अधिकारी, बेल्हे मंडल