शिल्पा शेट्टीने शेअर केला स्पेशल व्हिडिओ

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्‌टीची मुलगी समीशा शेट्‌टीला आज सोमवार, दि. 15 फेब्रुवारीला एक वर्षे पूर्ण झाले आहे. या खास दिवसानिमित्त शिल्पाने एक छोटीशी पार्टी आयोजीत केली आहे. यावेळी आपल्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त तिला बर्थडे विश करतानाच एक स्पेशल व्हिडिओ शिल्पाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओत शिल्पा आपल्या भावना व्यक्‍त करताना दिसत आहे. समीशा जमिनीवर रांगत असलेला व्हिडिओ शेअर करत असता शिल्पाने लिहिले की, “आई’ असा शब्द जेव्हा तूझ्या तोंडून मी प्रथम ऐकला आणि आता तु एका वर्षांची झाली आहेस, तेव्हा मला असे वाटले की संपूर्ण जीवनात यापेक्षा कोणतीही अनमोल भेट नाही.’

शिल्पा म्हणाली, तुझा पहिला दात येण्यापासून ते तु पहिला शब्द उच्चारणे, तुझे पहिले स्मित अन्‌ पहिल्यांदा क्रॉल करणे हे सर्व माझ्या स्मरणात आहे. माझ्यासाठी सर्व खूप अनमोल आहे. प्रत्येक दिवस साजरी करण्यासाठी ते एक कारण आहे.

माझ्या एंजलला पहिल्या वाढदिवसाच्या खुप-खुप शुभेच्छा! दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. यावर अनेकांनी कमेंटस्‌ करत समीशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment