#IPL2021 | करोनामुळे मुंबईतील सामन्यांबाबत संभ्रम

मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमासाठी निश्‍चित केलेल्या सहा केंद्रांत मुंबईचा समावेश असला तरीही आता येथील सामन्यांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. करोना बाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होत असताना या स्पर्धेतील सामने मुंबईत आयोजित करावेत का नाही याबाबत आता बीसीसीआय गांभीर्याने विचार करत आहे.

मुंबईतील ठाणे शहरात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. तेथील काही भागांमध्ये करोनाचे नियम कडक करण्यात आले आहेत. त्यातच आयपीएलचे वेळापत्रक येत्या रविवारी जाहीर केले जाणार असून त्यात मुंबईतील सामने अन्यत्र हलवण्यात यावेत यासाठी बीसीसीआयवर दडपण वाढत आहे.

मुंबईत यंदाच्या मोसमातील 10 सामने आयोजित केले जाण्याची शक्‍यता आहे. मात्र, करोनाच्या वाढत्या धोक्‍यामुळे मुंबईला आयोजक केंद्रातून वगळले जाण्याची शक्‍यताही वाढली आहे. आयपीएलचे आयोजन सहा शहरांमध्ये केले जाणार असून कोलकाता, बेंगळुरू, अहमदाबाद, चेन्नई व दिल्ली यांच्यासह मुंबईचाही समावेश करण्यात आला होता.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून करोनाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने येत्या काही दिवसांत पर्यायी केंद्राचा विचार करण्याबाबत चाचपणी केली जाणार आहे.

Leave a Comment