गाझातील बालकांसाठी श्रीलंका उभारणार कल्याणनिधी

कोलोंबो – युद्धग्रस्त गाझातील बालकांच्या कल्याणासाठी श्रीलंका १ दशलक्ष डॉलरचा कल्याण निधी उभारणार आहे. श्रीलंकेच्या सरकारच्यावतीने आज ही माहिती देण्यात आली. हा निधी उभारण्यासाठी श्रीलंका सरकार आणि सर्व मंत्रालयांनी काटकसरीचे धोरण अवलंबले आहे.

यानुसार रमझान महिन्यात सर्व इफ्तार पार्ट्या रद्द केल्या जाणार आहेत. या इफ्तार पार्ट्यांचा खर्च चिल्ड्रेन ऑफ गाझा फंडामध्ये जमा करण्यात येणार आहे, असे श्रीलंकेचे अद्यक्ष रनिल विक्रमसिंघे यांच्या कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

गाझात युद्धबंदी लागू व्हावी आणि पॅलेस्टिन स्थापनेचाही पुढाकार श्रीलंकेकडून केला जातो आहे. तसेच इस्रायलच्या सुरक्षिततेच्या उपाय योजनांवरही श्रीलंकेचे अध्यक्ष विक्रमसिंघे यांनी भर दिला आहे.

गाझातील आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गाजामध्ये आतापर्यंत ३० हजार पॅलेस्टिनी ठार झाले असून त्यामध्ये १० हजार हमासचे दहशतवादी असल्याचा दावा इस्रायलने केला आहे.