nagar | श्रीरामपूर बालगृहाच्या व्हा.चेअरमनपदी डाकले; खजिनदार फरगडे

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- येथील बालगृह तथा निरीक्षण गृहाच्या व्हा.चेअरमनपदी अजय डाकले तर खजिनदारपदी बाळासाहेब फरगडे यांची निवड करण्यात आली. चेअरमन अविनाश आदिक यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात ही निवड करण्यात आली आहे.

यावेळी अनुराधा आदिक, प्रशांत खंडागळे, सुजाता कासार, राकेश कुलथे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.बालगृह/ निरीक्षण गृह , श्रीरामपूर ही संस्था अनाथ, निराधार, निराश्रित व विधिसंघर्स बालकांच्या काळजी व सरंक्षणाशी संबंधित असणारी संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून बालकांना केंद्रस्थानी ठेवून बालकांचे पुनर्वसन कसे करता येईल तसेच संस्थेला आर्थिक मदत कशी जमवता येईल.

महाराष्ट्र शासन महिला व बाल विकासाच्या विविध योजना बालकांपर्यंत कश्या पोहचतील, यासाठी भविष्यकाळात आम्ही सर्व कार्यकारी मंडळ प्रयत्नशील राहू, असे आश्वासन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी दिले.