‘केंद्राकडे बोट न दाखवता राज्याने मदत करावी’

देवेंद्र फडणवीस : बारामती तालुक्यात शेतीच्या नुकसानीची पाहणी

बारामती (डोर्लेवाडी) : केंद्राकडे मदतीसाठी बोट न दाखवता राज्य सरकारने मदत करावी, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला. देवेंद्र फडणवीस यांनी बारामती तालुक्यातील उंडवडी कप या गावातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करत दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांकडून देखील नुकसानीची माहिती घेतली.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे. त्यामुळे राज्य सरकारने पंचनाम्याची वाट न बघता शेतकऱ्यांना भरघोस मदत करावी. राज्य सरकारने केंद्राकडे मदतसाठी बोट न दाखवता शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल हे पाहावे.

शरद पवारांची भूमिका ही दुटप्पीपणाची असल्याचं अनेक वेळा सिद्ध झाला आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना लगावला आहे. राज्य सरकारच्या मंत्र्यांनी आमचे दौरे घोषित केल्यानंतरच घराबाहेर पडले आहेत, चिमटा देखील फडणवीस यांनी काढला.

Leave a Comment