वाघोली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाबाबत आमदार चंद्रकांत पाटलांना निवेदन

वाघोली (प्रतिनिधी) : वाघोलीतील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे मागील ७ महिन्यांपासून पुणे महानगर पालिकेकडुन रखडलेले वेतन त्वरित प्राप्त होण्यासाठी महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची हवेली तालुका भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन निवेदन दिले. याबाबत महापालिका आयुक्त व महापौर यांच्याबरोबर बैठक घेऊन प्रश्न सोडवु असे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले.

१ जुलै पासुन वाघोलीमधून पुणे मनपाला ५ कोटी रुपये पेक्षा अधिक कर वसुल झाल्याचे समजते .वाघोली येथील कर्मचारी यांचे प्रति महिना वेतन रक्मक हि १८ लाख आहे. मागील ७ महिन्यांपासून गाव महानगर पालिकेत समाविष्ट झाल्यापासुन आजतागायत कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही.त्यासाठी सद्या पाठपुरावा सुरू आहे.
-अनिल  सातव पाटील (अध्यक्ष,हवेली तालुका भाजपा युवा मोर्चा)

महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये वाघोलीचे क्षेत्रफळ व लोकसंख्येच्यादृष्टीने सर्वात मोठे गाव आहे. ग्रामपंचायतीचे एकूण ९३ कर्मचारी महापालिकेच्या सेवेत कार्यरत असून सात महिने होत आले तरी त्यांचे वेतन आजतागायत दिले गेले नाही. या कर्मचाऱ्यांचा वेतन हाच एकमेव स्त्रोत असल्याचे त्यांच्या कुटुंबाचीही हलाखीची परीस्थित आहे. महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे यासाठी हवेली तालुका भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.