Stock Market: एशियन पेंट्‌स, टाटा मोटर्स, इंडसइंड बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक बसला फटका

मुंबई – अमेरिकेतील शेअर बाजार काल मोठ्या प्रमाणात घसरले. त्याचा परिणाम इतर देशाच्या शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजारावर होऊन निर्देशांक दोन दिवसानंतर कमी झाले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 187 अंकांनी कमी होऊन 60,858 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 57 अंकांनी म्हणजे 0.32 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 18,107 अंकावर बंद झाला.

आज झालेल्या विक्रीचा फटका एशियन पेंट्‌स, टाटा मोटर्स, इंडसइंड बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक, हिंदुस्तान युनिलिव्हर, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व, आयटीसी, नेस्ले या कंपन्यांना बसला. या परिस्थितीतही टाटा स्टील, पावर ग्रीड, टेक महिंद्रा, ऍक्‍सिस बॅंक, एचडीएफसी बॅंक, लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे निर्देशांकांची मोठी हानी टळली.

विश्‍लेषकांनी सांगितले की, अमेरिकेमध्ये ग्राहक वस्तू क्षेत्राची विक्री कमी होत असल्यामुळे तेथील जनतेची क्रयशक्ती कमी झाल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. त्याचा परिणाम युरोप आणि हॉंगकॉंग, व जपान येथील शेअर बाजारावर झाला.

त्यामुळे भारतीय बाजारात सकाळपासून कमी अधिक प्रमाणात निर्देशांक कमी झाले. त्यातच परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतातून विक्री करिता असून बुधवारी या गुंतवणूकदारानी 319 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली