शेअर बाजारात मोदींची लाट ; बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 11 लाख कोटींची वाढ

Stock market bounce ।  लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या सगळ्यांच्या समोर येणार आहे. मात्र त्याअगोदरच या निवडणुकीच्या एक्सिट पोलचा शेअर बाजारावर मोठा परिणाम दिसून येत आहे. कारण समोर आलेल्या पोलमध्ये देशात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचाच प्रभाव भारतीय शेअर बाजारात दिसतोय. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

प्री-ओपनिंग सेशनमध्ये मार्केटची काय स्थिती? Stock market bounce ।
सध्या शेअर बाजाराचे निफ्टी आणि सेन्सेक्स हे प्रमुख निर्देशांक चांगल्या स्थितीत दिसत आहेत. त्याची प्रचिती आज सकाळच्या मार्केट प्री-ओपिंग सेशनमध्येच दिसून आली. लोकसभा निकालापुर्वी शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायाला मिळाले आहे. प्री ओपनिंगमध्ये सेन्सेक्सने 3051 अंकांची तर निफ्टीनेही 870 अंकांनी उसळी घेतली.

 सेन्सेक्समध्ये 2000 अंकांची उसळी  Stock market bounce ।
प्री-ओपनिंग सेशनमध्ये दोन्ही निर्देशांकांनी मोठी उसळी घेतली. त्यामुळे शेअर बाजार चालू झाल्यामुळेदेखील सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगलीत तेजी पाहायला मिळाली. पहिल्या काही मिनिटांमध्ये सेन्सेक्स थेट 2200 पर्यंत उसळला. तर बाजार चालू होताच निफ्टीदेखील थेट 23,337.9 अंकापर्यंत वधारला. सेन्सेक्सने 76,738.89 अंकांचा ऐतिहासिक स्तर गाठल्याचे पाहायला मिळाले. सध्या हे दोन्ही निर्देशांक तेजीत आहेत. त्यामुळे सत्राच्या पहिल्या काही मिनिटांतच गुंतवणूकदारांनी चांगली कमाई केली आहे.

  गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा फायदा 
नेत्रदीपक रॅलीच्या आधारे, BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल पुन्हा एकदा 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेले आणि 5.09 ट्रिलियन डॉलर्सच्या नवीन उच्चांकावर पोहोचले. भारतीय चलनात सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल 423.21 लाख कोटी रुपये झाले. शुक्रवारच्या बंद पातळीपेक्षा हे 11.1 लाख कोटी रुपये अधिक आहे. म्हणजेच, आपण असे म्हणू शकतो की ज्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात पैसे गुंतवले त्यांनी आज काही मिनिटांच्या ट्रेडिंगमध्ये 11 लाख कोटी रुपयांहून अधिक कमाई केली.

बाजार ‘या’ पातळीवर व्यवहार करतोय 
आजच्या कामकाजाच्या पहिल्या तासानंतर, सकाळी 10:15 वाजता, BSE सेन्सेक्स 2,125 अंकांच्या (2.87 टक्के) वाढीसह 76,085 अंकांवर व्यवहार करत होता. त्याआधी सेन्सेक्सने आज ७६,७३८.८९ अंकांचा नवा सार्वकालिक उच्चांक गाठला. त्याचप्रमाणे, आज 23,338.70 अंकांचा विक्रम केल्यानंतर, निफ्टी सकाळी 10.15 वाजता 650 अंकांच्या (2.90 टक्के) वाढीसह 23,190 अंकांच्या वर व्यवहार करत होता.