शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्ससह निफ्टीत वाढ

Share Market Update|  देशातील लोकसभा निवडणुकींच्या निकालानंतर शेअर बाजारात झालेल्या घसरणीनंतर आज गुरुवारी शेअर बाजाराचे कामकाज तेजीसह सुरू झाले आहे. देशांतर्गत शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी चांगल्या रिकव्हरीच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. आज BSE सेन्सेक्स 696 अंकांच्या उसळीसह 75078 वर उघडला. सेन्सेक्सचे सर्व समभाग हिरव्या रंगात आहेत. दुसरीकडे, निफ्टी 50 नेही 178 अंकांची उसळी घेत 22798 च्या पातळीवर दिवसाची सुरुवात केली.

कोणत्या शेअर्समध्ये तेजी

बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी फार्मा आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांक किरकोळ घसरण नोंदवत होते. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात वाढ दर्शविणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये टाटा स्टील, कोल इंडिया लिमिटेड, एसबीआय, ओएनजीसी, एनटीपीसी, पॉवर ग्रिड आणि अदानी एंटरप्रायझेस यांच्या समभागांचा समावेश होता, तर एचयूएल, सिप्ला, ब्रिटानिया, नेस्ले इंडिया, डिव्हिस लॅब, हिंडाल्को आणि सन फार्मा यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

तसेच एनएचपीसी, इंजिनिअर्स इंडिया, भारत इलेक्ट्रॉनिक, इरकॉन इंटरनॅशनल, प्राज इंडस्ट्रीज, ओएनजीसी, अशोक लेलँड, विप्रो, एचसीएल टेक, इन्फोसिस, टीसीएस, लार्सन आणि बँकिंग क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.

BHEL च्या शेअर्समध्ये आतापर्यंत सर्वाधिक 10 टक्के वाढ झाली आहे. याशिवाय ओएनजीसी, अदानी पोर्ट्स, बजाज फेनसर्व्ह, बजाज फायनान्स, बीपीसीएल, पॉवर फायनान्स, आरईसी, गेल यांचे शेअर्सही वाढत आहेत. तर ब्रिटानिया आणि एचयूएलच्या समभागांमध्ये तोटा दिसून आला आहे. Share Market Update|

मिंडा इंडस्ट्रीज, केएनआर कन्स्ट्रक्शन, वर्धमान टेक्सटाइल्स, अमारा राजा बॅटरी,बिकाजी फूड्स, आदित्य बिर्ला रिटेल आणि मुथूट फायनान्स या कंपन्यांच्या शेअर्सनं सुरुवातीच्या व्यवहारात उच्चांक गाठला. तर अदानी पोर्ट्सचे शेअर एक टक्क्यानं वधारले, तर अदानी पॉवरचे शेअर्स सहा टक्क्यांहून अधिक वधारले. Share Market Update|

निवडणूक निकालाच्या दिवशी बाजारात मोठी घसरण

त्याआधी मंगळवारी निवडणूक निकालाच्या दिवशी बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. मंगळवार, 4 जून रोजी व्यापारादरम्यान, BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी 8 टक्क्यांपर्यंत घसरले. त्या दिवशी सेन्सेक्समध्ये 4,389.73 अंकांची  मोठी घसरण झाली आणि बाजार 72,079.05 अंकांवर बंद झाला. निफ्टी 1,379.40 अंकांनी घसरून 21,884.50 अंकांवर आला.

हेही वाचा: 

क्षत्रिय समाजाची नाराजी भाजपला पडली महागात ? या कारणामुळे यूपी-राजस्थानमध्ये जागा आल्या ‘कमी’