Stock Market: बॅंकांचे शेअर वधारले

मुंबई – रिझर्व बॅंकेने व्याजदरात कसलीही वाढ केली नाही. त्याचबरोबर आगामी काळातही रिझर्व बॅंकेचे पतधोरण अर्थव्यवस्थेला चालना देणारे असेल असे सूचित केले आहे. त्यामुळे गुरुवारी शेअर बाजारात बॅंका आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरच्या भावात भरघोस वाढ नोंदली.

बडोदा बॅंक वगळता इतर सर्व बॅंकांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. त्यामध्ये फेडरल बॅंक, एचडीएफसी बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडियाचा समावेश होता. ए यु स्मॉल फायनान्स बॅंक, ऍक्‍सिस बॅंक, इंडसइंड बॅंक, आयसीआयसीआय बॅंकेच्या शेअरच्या भावातही भरीव वाढ नोंदली गली. मात्र बडोदा बॅंकेच्या शेअरचा भाव काही प्रमाणात कमी झाला. बॅंकिंग क्षेत्राचा निर्देशांक आज एक टक्‍क्‍याने वाढून 44,683 अंकावर बंद झाला.