nagar | पेट्रोल पंपावर लावलेल्या कंटेनरची चारचाके चोरीस

राहुरी, (प्रतिनिधी): रात्रीच्या वेळेस रस्त्याच्या कडेला लावलेल्या कंटेनरची चार चाके व डिझेल ,असा एकूण १ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला. ही घटना राहुरी फॅक्टरी येथे दि. १८ मे रोजी रात्री संख्येश्वर पेट्रोल पंपावर कंटेनर लावलेला असताना घडली.

देवळाली प्रवरा येथील सतीश पोपट चव्हाण यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चव्हाण यांच्याकडे एमएच १७ सीव्ही १०६० हा कंटेनर आहे. त्यावर आबासाहेब विलास गाडे (रा. मोमीन आखाडा, ता.राहुरी) हे चालक आहेत.

चालक विलास गाडे याने दि. १७ मे रोजी रात्रीच्या दरम्यान कंटेनर राहुरी फॅक्टरी येथील संख्येश्वर पेट्रोलपंपावर लावला होता. चोरट्यांनी रात्रीच्या दरम्यान कंटेनरचे १ लाख ४० हजार रुपये किंमतीचे ४ डिस्क व ४ टायर तसेच ४२ हजार रुपये किंमतीचे ४५० लिटर डिझेल, असा एकूण १ लाख ८२ हजार रुपये किंमतीचा मु‌द्देमाल चोरून नेला.