चेअरवर बसले होते झुनझुनवाला आणि समोर उभे होते PM मोदी !

 

मुंबई – ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे आज निधन झाले आहे. ते 62 वर्षांचे होते. त्यांना भारताचे वॉरन बफे असेही म्हणल जात होत. झुनझुनवाला यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. झुनझुनवाला हे शेअर मार्केटमधील अनेक मात्तबर व्यक्तिमत्वांपैकी एक होते. अनेकांनी त्यांच्या टिप्स फ़ॉलो करून शेअर मार्केटमध्ये पैसे कमावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राकेश झुनझुनवाला यांची गेल्या वर्षी कुटुंबासह पंतप्रधान मोदींशी भेट झाली होती. त्यावेळी या बैठकीच्या एका फोटोवरून बरीच चर्चा रंगली होती. यामध्ये राकेश झुनझुनवाला खुर्चीवर बसलेले दिसत होते आणि पीएम मोदी त्यांच्यासमोर आदराने उभे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राकेश झुनझुनवाला यांची ही भेट 5 ऑक्टोबर 2021 रोजी दिल्लीत झाली होती. यावेळी त्यांची पत्नीही झुनझुनवालासोबत होती. या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्यासोबतचा फोटो ट्विट केला होता.

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी त्यावेळी
झुनझुनवालाचा हा फोटो शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिले, ‘वन अँड ओन्ली फक्त राकेश झुनझुनवालाला भेटून आनंद झाला. ते भारताविषयी अतिशय जिवंत, आशावादी आणि दूरदृष्टी असलेले व्यक्ती आहेत. पंतप्रधानांच्या या ट्विटवरून अनेक चर्चांना उधाण आले होते.

यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सन पंतप्रधान आणि एका बिजनेसमॅनमध्ये झालेल्या चर्चेबाबत तर्क वितर्क लावल्याचे पाहायला मिळले होते. तसेच नंतर ही भेट केवळ तब्येतीची विचारपूस करण्यासाठी असल्याचे कारण समोर आले होते.