समुद्रात दोन हजार फूट खाली आढळला विचित्र जीव; माशाचा नवीन प्रकार की एलियन याबाबत संभ्रम

वॉशिंग्टन : एलियन म्हणजेच परग्रहवासी याबाबत जगात सर्वांनाच कुतूहल आहे. पण सर्वसाधारणपणे हे एलियन्स किंवा परग्रहवासी हे अंतराळातून कोणत्यातरी ग्रहावरून येतात असे मानले जाते. पण आता समुद्राखाली दोन हजार फूट खोल एक विचित्र जीव आढळला असून तो माशाचा प्रकार आहे का एलियन आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

परग्रहवासीयांना म्हणजेच एलियन्सना अद्याप कोणीही पाहिलेले नाही पण त्यांच्या बाबत जी वर्णने ठिकाणी प्रसिद्ध केली जातात. ती वर्णने या समुद्राखाली सापडलेल्या जीवाला लागू होत असल्याने हा एलियन आहे की काय याबाबत एक शंका उपस्थित केली जात आहे.

समुद्राखाली सापडलेल्या या जीवाचे संपूर्ण शरीर पारदर्शक असून डोळे चमकदार आहेत या प्राण्याचे डोके संपूर्ण तीनशे 360 अंशामध्ये फिरू शकते तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या प्रकारच्या माशाला बरेली फिश असे म्हटले जाते याबाबत जो व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये हा मासा एखाद्या मानवी जिवा प्रमाणेच दिसत आहे आणि लांबून तो एखादा एलियन भासत आहे .

गेल्या आठवड्यात कॅलिफोर्निया समुद्रकिनाऱ्यावर संशोधकांना हा मासा सदृष जीव आढळला. सर्वप्रथम 1939 मध्ये संशोधकांना हा प्राणी दिसला होता. आतापर्यंत फक्त नऊ वेळा या माशाचे दर्शन संशोधकांना होऊ शकले आहे. समुद्रात आढळणारा हा जीव एक मासाच आहे असेच आता संशोधक सांगत आहेत.