मद्य वाहतुकीला आळा घालण्यासाठी खबऱ्यांचे जाळे भक्कम करा – उपमुख्यमंत्री

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध कार्यालयांच्या बांधकामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी आढावा घेतला. यावेळी अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती व मनोज सौनिक, प्रधान सचिव वल्सा नायर, आयुक्त कांतिलाल उमाप आदीची उपस्थिती होती.

अवैध मद्य आणि मद्यार्क वाहतुकीला आळा घालण्यासाठी खबऱ्यांचे जाळे भक्कम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच खबऱ्यांच्या बक्षीस रकमेत ५ टक्क्यावरु वरुन २० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. कार्यालय इमारती बांधताना यापुढे ‘ग्रीन बिल्डींग’ संकल्पनेचा आधार घेण्याच्याही सूचना करण्यात आली.

 

Leave a Comment