स्टेट बॅंकेच्या नफ्यात भक्कम वाढ; बॅंकिंग क्षेत्रात सकारात्मक वातावरण

नवी दिल्ली – भारतातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने दुसऱ्या तिमाहीचा चमकदार ताळेबंद जाहीर केला. या तिमाहीत बॅंकेचा नफा 55 टक्‍क्‍यांनी वाढून 6,504 कोटी रुपये इतका झाला आहे.

स्टेट बॅंकेने आज जाहीर केलेल्या ताळेबंद यामुळे आज एकूणच बॅंकिंग क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. स्टेट बॅंकेला गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत 4,189 कोटी रुपयांचा नफा झाला होता. विशेष बाब म्हणजे बॅंकेचे निव्वळ एनपीए म्हणजे अनुत्पादक मालमत्ता कमी होऊन एक केवळ एक पॉईंट सात टक्के इतकी नोंदली गेली आहे.

गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत ही अनुत्पादक मालमत्ता 1.8 टक्के इतकी होती त्यामुळे बॅंकेला खराब कर्जापोटी करावी लागणारी तरतूद केवळ पाच हजार 29 कोटी रुपये इतकी झाली आहे स्टेट बॅंकेने जाहीर केलेल्या ताळेबंद यामुळे केवळ स्टेट बॅंक नाहीतर इतर बॅंकांच्या शेअरच्या भावातही भरघोस वाढ नोंदली गेली.