एसटीची पहिली स्लिपर बस प्रवाशांच्या सेवेत दाखल

मुंबई : एसटी महामंडळाकडून एसटीच्या परळ आगारात स्लिपर आणि आसन व्यवस्था असणाऱ्या दोन्ही एसटी बसचे लोकार्पण करण्यात आले आहे. एसटीच्या रातराणी बस म्हणून यांची ओळख असणार आहे. तसेच पहिल्या टप्प्यात 40 बसेस राज्यात धावणार आहेत. माजी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष दिवाकर रावते संकल्पनेतील ही रातराणी नव्या रूपात आणि सर्वसामान्यांना परवडेल अशीच आहे.

सध्याच्या निमआराम बस बसच्या तिकीट दरात ही रातराणी प्रवाशांच्या सेवेत सुरू होत आहे. एकाच बसमध्ये 30 आरामदायी पुषबॅक आसने आणि त्याच्यावर 15 स्पेशिअस बर्थ असलेली विनावातानुकुलित सिटर कम स्लिपर बस आहे. अशी ही एसटीची विविधांगी बस नागरिकांच्या सेवेसाठी दाखल झाली आहे. असुरक्षित आणि अव्यस्थित असणारा खासगी प्रवास टाळण्यासाठी आणि या सेवेकडे गेलेला मोठा प्रवर्ग पुन्हा एकदा एसटीकडे वळवण्यासाठी महामंडळाकडून या बसेसची निर्मीती करण्यात आली आहे.

एकाच गाडीत बसण्यासाठी आणि झोपण्यासाठी बसेसची सोय करण्यात आली असल्याने याचा प्रवाशांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, विनावातानुकूलित असलेली ही बस मजबूत अशा मार्लल्ड स्टिलमध्ये तयार करण्यात आल्या आहेत. अशा 200 बस एसटीकडून निर्मिती करण्यात आली आहे. यातील 40 बस पहिल्या टप्प्यात राज्यातील विविध महामार्गांवर धावणार आहेत. रात्रीच्या आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा एक अनुभव प्रवाशांना या बसेसच्या माध्यमातून मिळणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात येत आहे.

Leave a Comment