सुब्रमण्यम स्वामी यांची याचिका फेटाळली

नवी दिल्ली – एअर इंडिया टाटा समुहाला विकण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या व्यवहाराची सीबीआयद्वारा चौकशी व्हावी असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले होते. या व्यवहारामुळे टाटांचा प्रचंड फायदा झाला आहे आणि यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, असे स्वामी यांचे म्हणणे होते.

केंद्र सरकारने सुब्रमण्यम स्वामी यांच्या या आरोपात तथ्य नसल्याचा युक्तिवाद केला. केंद्र सरकारचे वकील तुषार मेहता यांनी सांगितले की, स्वामी यांची याचिका गैरसमजांच्या आधारावर आहे. त्यामुळे न्यायालयाने या याचिकेवर विचार करण्याची गरज नाही. या संदर्भातील तपशिलात ऑर्डर अजून प्राप्त झालेली नाही. त्यामुळे ही ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर अभ्यास करून या याचिकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यायचे की नाही या संदर्भातील निर्णय स्वामी लवकरच घेण्याची शक्‍यता आहे.