हुश्श…करोना उपचारांसाठी 2,878 बेड्स वाढवण्यात यश

पुणे – करोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेता प्रशासनाने आवश्यकतेनुसार बेड नियोजन करण्यावर भर आहे. त्यानुसार मागील आठ दिवसांत बेड्सच्या संख्या वाढवण्यास यश आले आहे. मागील आठ दिवसांत जिल्ह्यात ऑक्सिजन विरहित, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेड्स अशी एकूण 2 हजार 878 बेड वाढवण्यात आले आहे.

 

राज्य शासनाकडून दि.1 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या 3 लाख 23 हजार 539 होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2,48,948 अशी वर्तविण्यात आली होती. तर करोनाचे ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 67 हजार 894 इतका अंदाज सांगण्यात आला होता. यानुसार प्रशासनाने बेडची संख्या वाढवण्यावर भर दिला.

 

जिल्ह्यात 3 हजार 151 ऑक्सिजनविरहित बेड्सची आवश्यकता भासेल, असा अंदाज आहे. त्यानुसार मागील आठवड्यात दिवसात 1,637 ऑक्सिजन विरहित बेड उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर ऑक्सिजन बेड्सची 2 हजार 66 इतकी आवश्यकता भासण्याचा अंदाज होता. त्यानुसार 1 हजार 192 ऑक्सिजन बेडची संख्या वाढवण्यात आली आहे. तर व्हेंटिलेटरची बेड्सची 250 आवश्यकता असून यामध्ये 49 बेड्स वाढवण्यात आले आहेत.

 

ऑक्सिजन बेड हे प्रामुख्याने सीओईपी येथील जम्बो हॉस्पिटल, पिंपरी येथील मगर स्टेडियम येथील जम्बो हॉस्पिटल, ससून, ऑटो क्लस्टर, डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आले आहे. तर पुणे महानगरपालिकेने कोविड केअर सेंटर येथील 20 टक्के बेड हे ऑक्सिजन बेड उभारले आहे. तर व्हेटिलेटर्स बेड हे जम्बो हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल, खासगी रुग्णालयामध्ये उभारले आहे.

Leave a Comment