सुहाना खान शेती करणार; खरेदी केली तब्बल १३ कोटींची ‘काळीमाती’

बॉलीवूड किंग शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान खूप चर्चेत असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सुहाना स्टारकिड्समध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि प्रत्येकजण तिच्या ग्लॅमरस लुकचे वेड आहे. ती लवकरच झोया अख्तरच्या द आर्चीजमध्ये दिसणार आहे.

या चित्रपटात सुहानासोबत श्रीदेवीची धाकटी लेक खुशी कपूर आणि अगस्त्य नंदाही दिसणार आहेत.
आता बातम्या येत आहेत की, सुहाना खानने अलिबागच्या थल गावात करोडो रुपयांचे शेत विकत घेतले आहे. 

सुहाना खानने यापूर्वीच अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले आहे. त्याच बरोबर तिने शेतीही विकत घेतली आहे. सुहाना खानने शेतजमिनीच्या नोंदणीच्या कागदपत्रांमध्ये स्वतःला शेतकरी असल्याचे सांगितले आहे. सुहाना खानच्या या स्टेपमुळे तिला काय करायचे आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या जमिनीची किंमत १३ कोटी रुपये आहे.

या दीड एकर जागेवर 2218 चौरस फूट बांधकामही करण्यात आले आहे. या जमिनीचा व्यवहार १ जून रोजी झाला असून त्यासाठी सुहानाने ७७ लाख ४६ हजार रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले आहे. सुहाना खानने ही जमीन तीन बहिणींकडून (अंजली, रेखा आणि प्रिया) विकत घेतली आहे. त्या बहिणींना त्यांच्या आई-वडिलांकडून ती जमीन वारसाहक्काने मिळाली आहे.

सुहाना खानने शेत विकत घेण्यापूर्वी शाहरुख खाननेही अलिबागमध्ये एक आलिशान बंगला बांधला आहे. किंग खानचा अलिबागमध्ये समुद्रकिनारी एक बंगला आहे, ज्यामध्ये स्विमिंग पूल आणि हेलिपॅड देखील आहे. त्याने त्याचा 52 वा वाढदिवसही अलिबागमध्ये साजरा केला होता.