निवडणुक काळात तब्बल ‘इतक्या’ शेतकऱ्यांची आत्महत्या; आकडा पाहून बसेल धक्का !

farmer Suicide । election – लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या काळात फक्त एप्रिल महिन्यात मराठवाड्यामध्ये २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. फक्त बीड जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यात सर्वाधिक ५९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

या ठिकाणी फक्त शेतकऱ्यांच्या आत्महत्येचीच समस्या नाही, पाणीटंचाईचीही गंभीर समस्या आहे. एकीकडे पाणीपातळी घसरली असून टँकरची संख्या १७५८ एवढी झाली आहे.

निवडणुकीच्या प्रचार काळामध्ये कृषी मालाच्या पडलेल्या भावाचा मुद्दा चर्चेत आला होता. अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी उमेदवारांना घसरलेल्या भावावरून प्रश्न विचारले. दीड वर्षापूर्वी तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी शेतकरी आत्महत्यांच्या अनुषंगाने तयार केलेल्या अहवालानुसार, २०१२ ते २०२२ या काळात ८,७१९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती.

बुधवारी (ता. १५) एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली. २५ वर्षीय या शेतकऱ्याने माजलगाव येथील गोपाळा बँकेकडून एक लाखांचे कर्ज काढले होते. बँकेकडून तगादा सुरू असल्याने त्रस्त आहे. मोठे कर्ज घेणारे परदेशी पळून जातात आणि छोट्या कर्जदारांना बँक त्रास देते, असे त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीमध्ये लिहिले होते.