सुपरस्टार रजनीकांत आपल्या मुलीसोबत करणार करिअरमधील 170 वी फिल्म

मुंबई – सुपरस्टार रजनीकांत आपल्या थलाईव्हा स्टाइलमुळे साऊथसह देशभरात प्रसिद्ध आहे. रजनीकांतने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. सध्या रजनीकांत आपल्या करिअरमधील १६९ वी फिल्म शूट करत आहे. यानंतर रजनीकांत १७० वा चित्रपट आपल्या मुलीसोबत करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.

एका इंग्रजी मनोरंजन माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार रजनीकांत आपल्या करिअरमधील १७० वी फिल्म आपल्या मुलीसोबत करणार आहे. रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.कोरोना काळात ऐश्वर्याने या चित्रपटावर काम करायला सुरुवात केली होती. रजनीकांत यांनी ही कथा ऐकल्यानंतर मुलीला यावर काम करण्यासाठी सांगितल्याचे देखील समजते.

रजनीकांत यांनी चित्रपटासाठी हो म्हंटल्यानंतर ऐश्वर्याने ‘लायका’ कंपनीला या चित्रपटाची आयडीला दिली आणि आता ही कंपनी या चित्रपटाच्या निर्मितीचा भार उचलणार असल्याचे समजते. सध्या रजनीकांत ‘जेलर’ या आगमी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाच्या शुटिंगनंतरच ते नव्या प्रोजेक्टवर काम करतील मात्र तत्पूर्वी त्याबाबतची घोषणा काही दिवसांमध्ये केली जाऊ शकते. रजनीकांत फॅन्ससाठी ही आनंदाची बाब आहे.