अंधश्रद्धा ! अमर झाल्याचं म्हणत, महंतांनी शिष्याला सांगितलं माझ्यावर वार कर अन्…

अहमदाबाद – जन्म आणि मृत्यू यावर आतापर्यंत अनेक अंदाज बांधण्यात आले आहेत. मात्र मृत्यूचं कोडं अद्याप माणसाला उमगलं नाही. शास्त्रात अनेकठिकाणी अमरत्वाचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे अनेकांना अमर व्हाव अर्थात मृत्यूवर विजय मिळवावा वाटतो. आध्यत्म त्याचा मार्ग असू शकतो, अशीही अनेकांची भावना आहे. मात्र याच अंधश्रद्धेतून गुजरातमध्ये एका महंताला आपला जीव गमवावा लागला.

भावनगरच्या गडा गावातील हनुमानजी मंदिराच्या आश्रमातील महंत म्हणाले, “मी सर्व विधी आणि तपश्चर्या केली असून आता मी अमर आहे. तुम्ही माझ्यावर हल्ला करा, मला काहीही होणार नाही.

 

दरम्यान महंतांच्या या आदेशानंतर शिष्याने हत्याराने त्यांच्यावर हल्ला केला. महंत तिथेच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. यातच मठाधिपतीचा मृत्यू झाल्याचं समजताच सेवकाने त्यांचा मृतदेह विहिरीत फेकून दिला.

 

दरम्यान महंत यांचा खून करण्यात आला असून गावातील रहिवासी नितीन कुरजी वनोदिया याने धारदार शस्त्राने वार करून मृतदेह आश्रमातील विहिरीत फेकल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आरोपीने महंतांच्या आदेशानंतरच वार केल्याचं म्हटलं आहे.