सातारा – शरद पवार यांच्या विचाराला साथ द्या : आ. बाळासाहेब पाटील

वडूज – सर्वसामान्य माणसांना न्याय मिळण्यासाठी राज्यात शरद पवार साहेबांच्या विचार धारेने काम करणारी माणस मोठी झाली पाहिजेत.या कामासाठी युवक व शेतकरी वर्गाने मोठे योगदान द्यावे असे आवाहन माजी पालकमंत्री आ.बाळासाहेब पाटील यांनी केले.

अंबवडे (ता.खटाव) येथे खंडोबा यात्रा व राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या वाढढिवसानिमित्त आयोजित प्रभाकर केसरी बैलगाडी शर्यतीच्या बक्षिस वितरण समारंभात ते बोलत होते.

यावेळी तासगाव चे युवानेते रोहित आर. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनीलभैय्या माने, तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, सुरेंद्र गुदगे, माजी सभापती संदीप मांडवे, हर्षदा जाधव-देशमुख, दिलीप तुपे, श्रीराम पाटील, मोहनराव देशमुख, बाळासाहेब सावंत, मकरंद बोडके, शशिकांत मोरे, सा. बा. निकम, अनिल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रभाकर देशमुख म्हणाले, युवकासह बळीराजाचा उत्साह वाढवण्यासाठी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. म्हसवडला एम. आय. डी. सी. होण्यासाठी शरदराव पवार यांनी ठोस प्रयत्न केल्यानेच माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंजुरी दिली होती. खटाव -मान तालुक्यातील रस्ते, शिक्षण, आरोग्य व इतर छोटे -मोठे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच आपण प्रयत्न केले आहेत. कोणतेही सत्ता नसताना आपल्या हातून चांगले काम करण्यासाठी लोकांचे पाठबळ मिळत आहे ही जमेची गोष्ट असून लोकांचे प्रेम न विसरण्याजोगे आहे.

यावेळी माजी सभापती रोहित पाटील, नंदू मोरे, पृथ्वीराज गोडसे, धनंजय क्षीरसागर, रविंद्र खाडे यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमास वडूजचे उपनराध्यक्ष मनोज कुंभार, संयोजक भालचंद्र कदम, सुनील गोडसे, विपूल गोडसे, सुरेंद्र मोरे, प्रकाश नलवडे, ज्ञानेश्वर शिंदे, मोहनराव बुधे, ऍड. संतोष पवार, डॉ. सोपान पवार, डॉ. राहूल दोलताडे, दीपक बोडरे, आप्पासो देशमुख, तुषार मोरे, नीलेश पवार, धनाजी दुबळे, परिसरातील कार्यकर्ते, शर्यतप्रेमी उपस्थित होते.

शिवम डोंबे, किशोर इंगवले, सुनिल मोरे,विकास जगदाळे यांनी सूत्रसंचालन व धावते समालोचन केले. डॉ.महेश माने यांनी आभार मानले.
शर्यतीत तुळजाभावी प्रसन्न खडकी, सचिनशेठ चव्हाण वाई, अधिरा सागर मदने लेंगरे, रॉयल कारभार ग्रुप गुरसाळे, स्वरा विजय मदने फलटण, प्रितेश जुगदर, एम. जी. माने ज्वेलर्स घरणीकी, सुमित दत्ता जाधव, पुसेगाव या बैलगाडी मालकांनी पहिले आठ क्रमांक पटकावले. शर्यत पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्यांना दहा सायकलींचे वाटप करण्यात आले.