वकील मारहाण प्रकरणातील आरोपी सुरेश गोसावी यास पोलीस कोठडी

बारामती  शहरात वीर सावरकर जलतरण तलाव येथे झालेल्या वकील मारहाण प्रकरणातील आरोपी सुरेश गोसावी याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे पि दरेकर यांनी दिले आहेत.

चारचाकी वाहनाला पाठीमागून धडक दिल्याने हा प्रकार दि. (3 )रोजी घडला होता. ॲड.अजित बनसोडे यांना शिवीगाळ व मारहाण करण्यात आली होती. यामध्ये काही पुरुष व महिलांचा समावेश होता. पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील आरोपी सुरेश गोसावी यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. जमावबंदी आदेश लागू असल्याने तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायाधीशांनी पोलीस कोठडी सुनावली आहे. आजित बनसोडे यांच्या वतीने सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी काम पाहिले.