सुषमा अंधारे म्हणल्या,”एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाणार” ; तर उदय सामंतांनी उत्तर देत म्हटले,”पुढचे मुख्यमंत्री..”

मुंबई : शिवसेनेच्या ( ठाकरे गटाच्या ) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी  एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत एक मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीवरून राजीनामा तयार ठेवण्याबाबत सूचना दिल्या असल्याचे वृत्त गुजरातमधील एका वृत्तपत्रात छापलं असल्याची धक्कादायक माहिती सुषमा अंधारे यांनी दिली आहे. त्याच्या या दाव्यानंतर आता शिंदे गटाकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. शिंदे गटाचे  मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतरउदय सामंत यांनी, “दीड वर्ष एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री असणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच भाजपा आणि शिवसेनेच्या निवडणुकीची रणनिती ठरणार आहे. तसेच, पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच असतील,” अशी आशा उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे.

‘सकाळी ९ वाजताचा भोंगा बंद झाला, तर ८० टक्के कटुता संपेल’, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. त्यावर प्रश्न विचारला असता, उदय सामंत यांनी म्हटलं, “ही फक्त देवेंद्र फडणवीस नाहीतर महाराष्ट्राची मागणी आहे. यात काहीही वावगं नाही. संजय राऊत त्यांच्यात आणि आमच्यातच कटुता वाढवत आहेतच. पण, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येही ते कटुता वाढवण्याचं काम करत आहेत. आपण राजकारणाचा केंद्रबिंदू ठरण्यासाठी संजय राऊत वागतात.”

अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याची चर्चावर बोलताना उदय सामंत यांनी, “या प्रश्नाला फारशी किंमत देत नाही. अजित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. खारघरच्या घटनेचं राजकीय भांडवल करू नये, असं आमचं मत आहे.” असे त्यांनी म्हटले.