कोविड-19 आणि एच3एन2ची लक्षणे सारखीच

कोरोनाच्या सततच्या संसर्गा दरम्यान, गेल्या एका महिन्यापासून देशात इन्फ्लूएंझा व्हेरिएंट एच3एन2 ची वाढती प्रकरणे समोर येत आहेत. सामान्यतः सौम्य लक्षणे मानल्या जाणाऱ्या इन्फ्लूएंझामुळे या वेळी लोकांसाठी मोठी समस्या निर्माण होत आहे. अभ्यासात असे आढळून आले आहे की एच3एन2 प्रकार गंभीर रोगास कारणीभूत ठरू शकतो, ज्याचा धोका लहान मुलांमध्ये आणि कमकुवत रोगप्रतिकारक प्रणाली असलेल्यांमध्ये दिसून येतो. या संसर्गामध्ये लोकांना सर्दी-खोकल्यासोबत ताप, डोकेदुखी आणि अंगदुखी आणि काहींना श्वास घेण्यास त्रास होत आहे. सहसा, अशीच समस्या कोरोना विषाणूच्या संसर्गादरम्यान देखील उद्भवते.

देशात अजूनही कोरोना संसर्गाची प्रकरणे नोंदवली जात असताना, एच3एन2 च्या वाढत्या संसर्गादरम्यान लोकांना हे समजणे कठीण होत आहे की हा कोविड-19 आहे की एच3एन2?
विशेष म्हणजे, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 754 नवीन रुग्णांची पुष्टी झाली आहे, तर आतापर्यंत एकूण एच3एन2 बाधितांची संख्या 451 आहे.

एच3एन2 बद्दल जाणून घ्या
एच3एन2 हा इन्फ्लूएंझा-ए व्हायरसचा उपप्रकार आहे ज्यामुळे इन्फ्लूएंझा संसर्ग होतो. तथापि, सामान्य इन्फ्लूएंझा संसर्गापेक्षा संक्रमित लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्‍यता जास्त असते. गंभीर प्रकरणांमध्ये, यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.
कॉमोरबिडीटी असलेल्या लोकांना यापासून विशेष संरक्षण आवश्‍यक आहे. अशा लोकांमध्ये एच3एन2 आणि कोरोना संसर्गाचा धोका जास्त असू शकतो. चला जाणून घेऊ या दोघांची लक्षणे कशी वेगळी करता येतील?

एच3एन2 ची लक्षणे
एच3एन2 ची लागण झालेल्या लोकांमध्ये आतापर्यंत सामान्य इन्फ्लूएंझा संसर्गामध्ये दिसलेली लक्षणे जवळजवळ समान आहेत. तथापि, काही लोकांना गंभीर लक्षणे विकसित होण्याचा धोका जास्त असू शकतो. बाधितांना थकवा-आळस, अंगदुखी, घसा खवखवणे, खोकला, सर्दी आणि गंभीर प्रकरणांमध्ये, श्वासोच्छवासाच्या समस्यांसोबतच जास्त ताप असू शकतो. हा प्रकार काही काळ कायम राहिल्यास डॉक्‍टरांचा सल्ला घ्या.

कोरोना संसर्गाची लक्षणे
गेल्या तीन वर्षांत कोरोनाच्या अनेक प्रकारांचा संसर्ग दिसून आला आहे. ताप, घसा खवखवणे, सर्दी, डोकेदुखी-शरीर दुखणे आणि थकवा जाणवणे असे आजार बहुतांश संक्रमित लोकांमध्ये दिसून आले. काही प्रकरणांमध्ये, कोरोना संक्रमितांनी पचनसंस्था आणि श्वसन प्रणालीशी संबंधित समस्या देखील नोंदवल्या आहेत. मात्र, नवीन प्रकारांमध्ये चव आणि वास नसणे या समस्या दिसत नाहीत.

कोविड-19 आणि एच3एन2 मध्ये फरक कसा करायचा?
जरी कोविड-19 आणि एच3एन2 हे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या विषाणूंमुळे होणारे संक्रमण आहेत, परंतु हे दोन्ही संक्रमण श्वसनसंस्थेवर परिणाम करत असल्याने, दोन्ही संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये समान लक्षणे असू शकतात. इन्फ्लूएंझा आणि कोविड-19 या दोन्हींमुळे घसा खवखवणे, खोकला, अंगदुखी आणि वाहणारे नाक यासोबत ताप येऊ शकतो.

डॉक्‍टरांनी सांगितले की एच3एन2 विषाणूचा फुफ्फुसांवर फारसा परिणाम होत नाही, तर कोविड-19 ग्रस्त बहुतेक रुग्णांमध्ये फुफ्फुसांशी संबंधित समस्या दिसून आल्या आहेत. चव आणि वास कमी होणे हेच उजतखऊ-19 ला एच3एन2 पेक्षा वेगळे बनवते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या दोघांमधील फरक ओळखण्याचा अस्सल मार्ग म्हणजे त्याची चाचणी करणे.
दोन्ही प्रकारचे संसर्ग टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. मास्क लावणे, साबण आणि सॅनिटायझरने वारंवार हात धुणे यामुळे सहज प्रतिबंध करता येतो.