#T20WorldCup | ऑस्ट्रेलियात टीम इंडियावर अन्याय? पाकिस्तान संघाला ५ स्टार हॉटेल तर भारताला…

टी-२० विश्वचषकाला ( T20 World Cup ) सुरुवात झाली असून सध्या पात्रता फेरीतील सामने खेळवले जात आहेत. या सामन्यांमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला. कारण १६ ऑक्टोबर रोजी झालेल्या श्रीलंका विरुद्ध नामिबिया सामन्यात अनपेक्षित असा निकाल पाहायला मिळाला. आशिया चषक २०२२ विजेत्या श्रीलंकेला नामिबियाने ५५ धावांनी मात दिली. त्यानंतर १७ ऑक्टोबर रोजीच्या सामन्यात स्कॉटलंड संघाने विश्वविजेत्या वेस्ट इंडिज संघाला ४२ धावांनी पराभवाचे तोंड दाखवले आहे. दरम्यान सोशल मोडियावर काही भारतीय चाहते आयसीसी आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर नाराज असल्याचे समोर आले आहे.

#T20WorldCup । काय ती विराटची फिल्डिंग, काय तो त्याने घेतलेला कॅच; सगळं एकदम ओक्के…

टी-२० विश्वचषकातील ( T20 World Cup ) सराव सामने खेळण्यासाठी भारतीय संघ १५ ऑक्टोबरला ब्रिस्बेन येथे पोहोचला. भारताला दोन सराव सामने खेळायचे आहेत. त्यातील पहिला सराव सामना आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध पार पडला. या सामन्यात भारताने कांगारूंना ६ धावांनी मात दिली आहे. मात्र भारतीय संघ येथे पोहोचताच चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. भारतीय संघाला सुविधा देण्याबाबत ऑस्ट्रेलिया आणि आयसीसीने दुजाभाव केला असल्याचे म्हटले जात आहे.

भारतीय संघ ब्रिस्बेन येथे सराव सामना खेळण्यासाठी पोहोचला तेव्हा संघाला ४ स्टार हॉटेलमध्ये चेक-इन करण्यास चांगण्यात आले. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाला देण्यात आलेल्या ५ स्टार हॉटेलमध्ये पाकिस्तान संघाला चेक-इन करण्यास सांगितले आहे. त्यामुळे भारतीय संघासोबत दुजाभाव केला जात असल्याचे सोशल मीडियावर म्हटले जात आहे. त्याचबरोबर काही चाहत्यांनी आयसीसी आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेटवर टीका देखील केली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज टी-२० विश्वचषकातील ( T20 World Cup ) सराव सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला ६ धावांनी विजय मिळवण्यात यश आले. या रोमहर्षक सामन्यात दोन्ही संघांनी दमदार खेळ दाखवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकांच्या बळावर संघाने २० षटकांत १८७ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाला दिले. कांगारूंकडून फलंदाजीत त्यांच्या कर्णधार ऍरॉन फिंचने दमदार फलंदाजी केली. मात्र विराट कोहलीच्या अविश्वसनीय क्षेत्ररक्षणासमोर ऑस्ट्रेलिया संघ पराभवाचा बळी ठरला.