#T20WorldCup #INDvPAK : असे रंगले अखेरचे षटक, पहा व्हिडीओ….

मेलबर्न :  विराट कोहलीची अफलातून वादळी फलंदाजी आणि हार्दिक पंड्या व रवीचंद्रन अश्‍विनने दिलेली योग्य साथ यांच्या जोरावर भारतीय संघाने येथे सुरु असलेल्या टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत रविवारी (India beat Pakistan by 4 wickets in last-ball thriller) पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत आठ गडी गमावून 159 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 20 षटकांत 6 बाद 160 धावा करत विजय साकार केला.

अतितटीच्या आणि शेवटच्या षटकांपर्यत रंगलेल्या सामन्यात भारताला शेवटच्या (20 व्या ) षटकात 16 धावांची गरज होती आणि या सामन्यातील 20 वे षटक अत्यंत नाट्यपूर्ण ठरले. त्यात पाक खेळाडूंनी पंचांशी वादही घातला. कोहलीने आपली आक्रमक फलंदाजी सिद्ध केली. पंड्या व कार्तिक बाद झाल्यावरही अश्‍विनने डोके शांत ठेवत कोणतेही दडपण न घेता विजयासाठी आवश्‍यक असलेली एक धाव घेतली व भारताचा विजय साकार केला.

पहिला चेंडू – हार्दिक पंड्या बाद
दुसरा चेंडू – दिनेश कार्तिकने 1 धाव घेतली
तिसरा चेंडू – कोहलीने 2 धावा घेतल्या

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

चौथा चेंडू – नो-बॉलवर कोहलीचा षटकार तसेच फ्री हीटही मिळाली. या निर्णयावरून पाक खेळाडूंचा पंचांशी वाद
चौथा चेंडू – वाईड
चौथा चेंडू – बाईजवर 3 धावा. कोहली क्रीझमध्येच होता. मात्र, हा चेंडू फ्री हीट असल्याने बाईज धावा बहाल. चेंडू यष्टीला लागल्यावर थर्डमॅनच्या दिशेने गेला व फलंदाजांनी 3 धावा काढल्या. यावेळी कोहली क्रीझमध्येच असल्याने यष्टी उडाल्यावरही नो-बॉलची फ्री हीट असल्याने ठरला नाबाद.

पाचवा चेंडू – कार्तिक यष्टिचीत बाद

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

सहावा चेंडू – वाईड (धावसंख्या बरोबरीत)

सहावा चेंडू – अश्‍विनने विजयी धाव घेतली.