T20 World Cup 2024 (IND vs PAK Toss Update) : आज टी-20 विश्वचषक 2024 च्या 19 व्या सामन्यात भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होत आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना रात्री 8 वाजता सुरू होईल.
मागील सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ येथे पोहोचला आहे, तर गेल्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आज दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर संकटाचे ढग दाटले आहेत. पावसामुळे या महान सामन्याच्या नाणेफेकीला विलंब होऊ शकतो. सध्या, खेळपट्टी झाकली गेली आहे. न्यूयॉर्कमध्ये सात वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे.
पंचांनी रोहित आणि बाबरशी बराच वेळ चर्चा केली. 7.45 वाजता पंच पुन्हा खेळपट्टीची पाहणी करतील.
🚨 UPDATE 🚨
Toss delayed due to rain, the square remains under cover.
Stay Tuned for more updates ⌛️
Follow The Match ▶️ https://t.co/M81mEjp20F#T20WorldCup | #TeamIndia | #INDvPAK
— BCCI (@BCCI) June 9, 2024
दरम्यान, टी-20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्ध उत्कृष्ट विक्रम आहे. 2007 पासून या स्पर्धेत दोन्ही संघ सात वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारताने सहा वेळा तर पाकिस्तान संघाने एकदा विजय मिळवला आहे.
त्याच वेळी, एकूण टी-20 मध्ये दोन्ही संघांमध्ये 12 सामने झाले आहेत. भारताने आठ वेळा आणि पाकिस्तानने तीन वेळा विजय मिळवला आहे. 2007 मध्ये, एक सामना टाय झाला होता, जो टीम इंडियाने बाॅल आउटमध्ये जिंकला होता. म्हणजेच टीम इंडियाने एकूण 12 पैकी नऊ जिंकले आहेत.